लांजा:- अज्ञात वाहनाच्या धडकेत २६ वर्षीय मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात वाटूळ दाभोळे मार्गावर लांजा तालुक्यातील भांबेड येथे बुधवारी २० मार्च रोजी ११.४५ च्या दरम्याने घडला आहे .याप्रकरणी रात्री १२.२१ वाजता अपघाताची नोंद करण्यात आली आहे
याबाबतची फिर्याद सयाजी बुधाजी जाधव( व ५३ वर्षे राहणार पांगरी खुर्द राजापूर ) यांनी लांजा पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सयाजी जाधव यांचा मुलगा सिद्धांत सयाजी जाधव (वय वर्षे २६ रा. पांगरी खुर्द राजापूर) हा त्याचा मित्र प्रशांत बागवे याला लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन येथे सोडण्यासाठी आपल्या मोटरसायकलने गेला होता. हिरो कंपनीची सीडी डीलक्स मोटरसायकल (क्रमांक एम एच ०८- टी- ३६५९) या मोटारसायकलने बुधवारी २० मार्च रोजी
आपण मित्राला सोडण्यासाठी जात आहोत त्यामुळे उशीर होईल असे त्याने घरच्यांना सांगितले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने सिद्धांत जाधव याचा भाऊ संकेत याने त्याच्या मोबाईलवर रात्री १२.१५ फोन केला असता त्याचा मोबाईल पोलिसांनी उचलून त्याचा अपघात झाल्याचे त्यांना सांगितले .
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सिद्धांत याच्या डोक्यास तसेच पायाला गंभीर दुखापती झाल्याने त्याला प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास वैद्यकीय उपचार चालू असताना सिद्धांत याचे निधन झाले या अपघाताची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.