जिल्ह्यात कॉक्ससाकी विषाणूचा प्रादुर्भाव

आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; उपचार करून घेण्याचे आवाहन

रत्नागिरी:-  हात, पाय आणि तोंडात कॉक्ससाकी या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. ज्याला आपण मराठीत हात, पाय आणि तोंडाचा रोग (आजार) म्हणतो. जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन त्वरित उपचार करावा तसेच हा आजार संसर्गजन्य असल्याने अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास शाळा प्रशासनाने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

हा विशेषकरून लहान मुलांमध्ये पसरतो आणि हात, पाय आणि तोंडावर परिणाम करतो. त्यामुळे संपूर्ण शरीरावर खडबडीत फोड, पुरळ पसरते. हा आजार सहसा 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना संक्रमित करतो. परंतु काही वेळा मोठी मुले व प्रोढाना देखील याचा त्रास होऊ शकतो. मुलांच्या अंगावर पुरळ उठण्याची समस्या असल्यास पालकांनी तात्काळ शासकीय दवाखान्यात जाउन उपार घ्यावेत असे सांगण्यात आले आहे.

आजाराची लक्षणे:
•कधी कधी ताप,घसा खवखवणे,घशात वेदना होणे. •आजारी वाटणे ,सुस्तपणा जाणवणे.•सामान्यत तोंडाच्या मागील बाजूस जीभ,हिरडय़ा,गालाच्या आतील बाजूस व्रण किवा फोड येणे. •हातापायाची तळवे किंवा कधीकधी नितंबावर पुरळ येणे,खाज येत नाही पण फोड येऊ शकतात. •भूक न लागणे ,मुले वारंवार चिडचिड करतात. क्वचित प्रसंगी हा विषाणू मेंदूला किंवा पाठीच्या कण्याला हानी पोहावू शकतो, परिणामी ताप येतो. •निर्जलीकरण, मेंदूज्वर, इंसेफालायटीस सारखे गंभिर परिणाम होऊ शकतात.

कारणे:
•आजार संसर्गजन्य असल्यामुळे नाक आणि घशातील स्राव, लाळ, फोड द्रव, श्लेष्मा किंवा विष्ठेसह एका व्यक्तीपासून दुस्रया व्यक्तीमध्ये पसरतो.•संक्रमित व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क येणे. •आजारी व्यक्तीच्या शिंकणे किंवा खोकल्याच्या संपर्कात येणे. •दूषित वस्तूंना स्पर्श करणे,जसे की (खेळणी किंवा दरवाजाचे नॉब), •स्विमिंग पूलसारख्या संक्रमित पाण्याच्या संपर्कात येणे.

प्रतिबंध:
•हात धुणे आणि हॅन्ड सॅनिटायझर वापरा.शारीरिक स्वच्छता पाळा. •दरवाजाचे नॉब्स, खेळणी, टेबल इत्यादीसारख्या सामान्य भागांना निर्जंतुक करा. •कपडे,नॅपकिन्स किंवा टॉवेल स्वच्छ ठेव. •सार्वजनिक ठिकाणी आणि आजारी रुग्णांच्या संपर्कात असताना मास्क घाला.

डॉक्टरांना कधी भेटावे:

  • मूल 1 वर्षापेक्षा लहान असल्यास, •उच्च दर्जाचा ताप,तोंडी औषधांना प्रतिसाद देत नाही. •तोंडी काहीही न स्वीकारणे, निर्जलित दिसणे, लघवीचे प्रमाण कमी झाले आहे.•खूप चिडचिड, किंवा कंटाळवाणा आणि जास्त झोप. •फोड / पुरळ संक्रमित दिसणे पू निचरा होणे.

उपचार:
हात-पाय आणि तोंडाच्या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार नाही. परंतु लहान मुलांना हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. तसेच आजारी असताना सहन करू शकतील असे मऊ अन्न द्यावे. काही दिवस दूध आणि ओआरएसएल (सफरचंद) द्यावे. ताप आणि वेदना कमी करण्यासाठी औषध वापरण्यास सुरक्षित आहे. डॉक्टरांच्या सल्याने शरीरावरील पुरळ/फोडांवर वापरण्यासाठी अँटी-इच ओव्हर-द-काउंटर क्रीम आणि लोशन वापरु शकतात.

हे करा :
•खेळणी निर्जंतुक करण्यासाठी ब्लीच किंवा सनिटायझर वापरा. •आपले हात स्वच्छ धुवा.(विशेषत डायपर बदलल्यानंतर)•तब्येतीत सुधारणा होत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.• ताप उतरेपर्यंत संपूर्ण विश्रांती घ्या. •दुषित पृष्ठभाग स्वच्छ करा.
हे करु नका:
•अस्वच्छ हातानी डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे. •द्रव पदार्थ घेणे टाळणे. •डॉक्टरांनी सांगितलेली खबरदारी व औषधे टाळणे. •पिण्याचे कप व खाण्याची भांडी सामायिक करणे. •डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे वापरणे.

विधानसभा मतदानादिवशी मतदारांना सुट्टी

रत्नागिरी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील, असे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कळविले आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनांमधील कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.

मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसासाठी सामन्यता वेतन मिळणार नाही, या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्यादिवशी त्याला सुट्टी दिली नसती, तर त्यांनी काढले असते असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल. जर एखाद्या नियोक्त्यांने उपकलमाच्या तरतुदीचे उल्लघंन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल. हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही, ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे, त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.

वर नमूद केल्यानुसार मतदारास मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, संबंधित नियोक्त्याविरुध्द नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेस, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींच्या मालकांनी, व्यवस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, असे आवाहनही श्री. आयरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02352-223209 वर संपर्क साधावा.

विधानसभा मतदानादिवशी मतदारांना सुट्टी

रत्नागिरी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील, असे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कळविले आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनांमधील कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.

मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसासाठी सामन्यता वेतन मिळणार नाही, या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्यादिवशी त्याला सुट्टी दिली नसती, तर त्यांनी काढले असते असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल. जर एखाद्या नियोक्त्यांने उपकलमाच्या तरतुदीचे उल्लघंन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल. हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही, ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे, त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.

वर नमूद केल्यानुसार मतदारास मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, संबंधित नियोक्त्याविरुध्द नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेस, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींच्या मालकांनी, व्यवस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, असे आवाहनही श्री. आयरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02352-223209 वर संपर्क साधावा.

देवरूखात घरफोडी, 7 लाखांचा ऐवज लंपास

देवरूख:- शहरातील रोहिदास आळी येथे भरदिवसा घरफोडी होवून सोने दागिने, चांडो, रोख रक्कम असा एकूण 7 लाख 36 हजार रूपये किंमता ऐवज चोरट्यांनी लंपास केल्यी घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या बाबतची फिर्याद संतोष बापू कदम (रा. रोहिदास आळी, देवरूख) यांनी दिली. संतोष कदम व घरातील मंडळी सोमवारी दुपारी 3 ते 5 या कालावधीत कामानिमित्त बाहेर गेली होती. याची संधी साधत कदम यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी हत्याराने उचकटून आतमध्ये प्रवेश केला. कदम हे काम आटोपून घरी आले असता चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या घटनेची माहिती कदम यांनी देवरूख पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस निरीक्षक नामदेव जाधव, संदीप जाधव, श्रीकांत जाधव यांनी घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी श्वानपथक, ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. हे श्वानपथक परिसरात घुटमळले.

या चोरीत कदम यांचे 93 ग्रॅम वजनाचे 6 लाख 56 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने, 10 हजार रूपये किंमतीची चांदीची मोड, 70 हजार रूपये रोख रक्कम असा एकूण 7 लाख 36 हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संतोष कदम यांचे शेजारी राहणारे सीताराम तुकाराम कदम यांच्या घरातून 35 हजार रूपये रोख रक्कम लंपास केली. अज्ञात चोरट्यावर देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 331 (3), 305 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी मतदारसंघात 942 जणांचे टपाली मतदान

रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदार संघात विविध मतदान केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या आणि बंदोबस्तावर असणारे पोलीस अशा 942 जणांनी आज टपाली मतदान करुन आपला हक्क बजावला. उद्याही टपाली मतदान या केंद्रावर होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.

शहरातील रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.15, दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर आज हे टपाली मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीसांनी केले. एकूण 1567 पैकी आज पहिल्या दिवशी 942 जणांनी आपले मतदान केले. उद्याही याच ठिकाणी टपाली मतदान होणार आहे. यामध्ये दापोलीमधील 71, गुहागरमधील 66, चिपळूणमधील 88, राजापूरमधील 73 आणि इतर जिल्ह्यातील 171 अशा एकूण 942 जणांना समावेश आहे.

भव्य सेल्फी पॉईंट खास आकर्षण

दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर भव्य असा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. याठिकाणी मतदान करुन आल्यानंतर मोठ्या संख्येने एकमेकांची सेल्फी काढण्यात मतदार गुंतले होते. या फलकावर ‘जागृत नागरिक होऊ या.. अभिमानाने मत देऊ या, जागृत मतदार..सशक्त लोकशाहीची ताकद अशी विविध जनजागृती करणारी घोषवाक्ये आकर्षित करत होती. निवडणूक निर्णय अधिकारी देसाई, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मतदारांसाठी मार्गदर्शन करत होते. या केंद्रावर पिण्याची पाण्याची सोय, आरोग्याची सोय त्याचबरोबर टपाली मतदानाचा मोठा सूचना फलक लक्ष वेधून घेत होता.

गुंतवणुकीवर जास्त फायदा मिळण्याचे आमिष दाखवून 61 लाखाला गंडा

चिपळूण:- गुंतवणूक केल्यास मोठया प्रमाणात नफा मिळेल, असे आमिष दाखवून यातूनच एका गुंतवणूकदाराची तब्बल 61 लाख 22 हजार 811 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना 16 ऑगस्ट ते 6 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील पागमळा परिसरात घडली.

या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, ऍन्झो कॅपिटल या कंपनीची प्रतिनिधी असल्याचे भासवणाऱ्या अक्शा नामक महिलेवर चिपळूण पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना अना नावाच्या टेलीग्राम अकाउंटवरुन अक्शा नावाची महिला ऍन्झो कॅपिटल या कंपनीसाठी फॉरेक्स ट्रेडिंगचे काम करत असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठया प्रमाणात नफा मिळेल, असे सांगितले. त्यासाठी व्हॉटस्अपॅवरुन ऍन्झो कॅपिटल या नावाची लिंक पाठवल्यानंतर अक्शा हिने तक्रारदार यांना रजिस्ट्रेशन करायला सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी आधारकार्डव्दारे या ट्रेडिंग लिंकमध्ये नोंदणी केली. त्यानंतर सुरुवातीस केलेल्या गुंतवणुकीमध्ये नफा परतावा मिळाल्याने अक्शा हिच्या सांगण्यावरुन गुंतवणूक केली गेली. ती ऍन्झो कॅपिटल या कंपनीची प्रतिनिधी असल्याचे भासवून तक्रारदार यांना बनावट ट्रेडिंग कपंनीची लिंक पाठवून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून 61 लाख 22 हजार 811 रुपये गुंतवण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार तक्रारदार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातखंबा येथे 35 लाखांचे सोने- चांदी ताब्यात

रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाच्या नाकाबंदीने सर्वांची झोप उडाली आहे. स्थिर व फिरत्या तपासणी पथकाच्या डोळ्यांखालून कुणी सुटू शकणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मागील काही दिवसांत लाखो रुपयांची रोख व किमती ऐवज जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी पथकाने एका सोन्याची पेढीचे सोने व चांदी असा सुमारे 35 लाखांचा ऐवज ताब्यात घेतल्यामुळे सुवर्णकारांमध्ये खळबळ उडाली आहे.

निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून रत्नागिरी विधानसभेत येणार्‍या वाहनांची स्थिर व फिरत्या पथकांद्वारे तपासणी करण्यात येत आहे. तालुक्याच्या बाहेर जाणार्‍या मार्गांवर तपासणी पथके तैनात असून हजारो गाड्या आतापर्यंत तपासण्यात आल्या आहेत. अगदी दुचाकी वाहनेही तपासण्यात येत आहेत.

सोमवारीही बँका तसेच एटीएमना रोकड पोहचवणार्‍या गाड्या तपासण्यात आल्या. त्यांच्याजवळ असणार्‍या कागदपत्रांप्रमाणेच कॅश आहे का, याची मोजणी करण्यात आली. जवळपास सव्वा कोटीच्या आसपास या गाड्यांमध्ये कॅश होती; मात्र कागदपत्रांनुसार कॅश बरोबर मोजली गेल्यावर ती सोडण्यात आली.

मंगळवारीही एका सुवर्णपेढीचे सोने व चांदी रत्नागिरीत आणण्यात येत होते. यात 439 ग्रॅम सोने, तर 2 हजार 503 ग्रॅम चांदी म्हणजे अडीच किलो चांदी गाडीमध्ये होती. गाडीतील व्यक्तींकडे असणार्‍या कागदपत्रावर स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे ही गाडी ताब्यात घेण्यात आली. संबंधित व्यक्तींना पूर्ण कागदपत्रे आणण्याच्या सूचना अधिकार्‍यांनी केल्या, तोपर्यंत किंमती ऐवज ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे सुवर्णकारांमध्येही खळबळ उडाली आहे. अशा पध्दतीने प्रथमच कारवाई झाल्याचे मत सुवर्णकारांकडून व्यक्त करण्यात आले.

जीवन देसाई, निवडणूक निर्णय अधिकारी, रत्नागिरी मतदारसंघयापूर्वी बँका व एटीएमना कॅश पोहोचवणार्‍या गाड्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. सर्वच व्यावसायिकांना समान न्याय आहे. कॅश किंवा किमती ऐवज सोबत ठेवताना त्याची कागदपत्रेही जवळ बाळगावीत. सुवर्णपेढी व्यावसायिकांनी सोने किंवा चांदीची खरेदी-विक्री कागदपत्रे वाहतुकीच्यावेळी सोबत ठेवावीत.

साखरतर येथे किरकोळ कारणातून तरुणाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील साखरतर मोहल्ला येथे एकाला चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवार 10 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वा. सुमारास घडली. सज्जाद सद्दाम होडेकर, अमर नाझीम मुल्ला (दोन्ही रा.साखरतर मोहल्ला,रत्नागिरी) आणि इतर दोन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्या विरोधात जुहेर मोहम्मद हनिफ पटेल (28, रा. राजीवडा बुडीये मस्जिदजवळ,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री तो मावस बहिणीला साखरतर येथील घरी सोडून परतत असताना सज्जाद होडेकरने फिर्यादीला तू इकडे का आलास, कोठून आलास असे विचारुन हातातील लोखंडी फायटरने डोक्यात मारहाण केली. तर अमर मुल्लानेही त्याला हातांनी मारहाण करुन इतर दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपुरात भक्तांचा महापूर; गर्दीचे मागील उच्चांक मोडीत

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या विट्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त मंगळवारी भाविकांचा भक्तीचा मळा फुलला होता. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी यावर्षी अलोट गर्दी केली होती. रामआळी, मारुती आळी, गोखले नाका आदी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. गर्दीने मागील उच्चांक मोडीत निघाला.

प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जिल्ह्याभरातून भाविकांनी दर्शन व यात्रेच्या खरेदीला भाविकांची मोठी गर्दी केली होती. रत्नागिरीत अतिशय भक्तीभावात, उत्साहात कार्तिकी एकादशी उत्सव पार पडला. एकादशीनिमित्त मंदिरातील वातावरण टाळ-मृदुगांच्या, विठ्ठल रखुमाईच्या नामगजराने भक्तीपूर्ण होऊन गेले होते. श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींना अलंकारांनी सजवण्यात आले. पहाटे विधीवत पूजा अर्चा झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले होते. याचबरोबर प्रतिवर्षाप्रमाणे काकड आरती पहाटे चार वाजता, त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले.मंदिराच्या सभामंडपात अनेक मंडळांनी दिवसभर भजन सादर करून विठ्ठल चरणी सेवा अर्पण केली.
रात्री 12 वाजता विठुरायाचा रथ प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. गोखले नाका, राधाकृष्ण नाका, गवळीवाडा येथील दत्तमंदिरला रात्री 2 वाजता भेटून राधाकृष्ण मार्ग राम आळी, मग तेली आळी, मारूती आळी व तेथून विठ्ठल मंदिर या ठिकाणी रथ स्थानापन्न होतो. पालखी श्री देव भैरीच्या भेटीला जाते. पहाटे 5 वाजता पालखी पुन्हा मंदिरात येऊन विसावते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही देवस्थानाने भाविकांसाठी उत्सवाची उत्तम व्यवस्था केली. याचबरोबर कुवारबाव येथील विठ्ठल मंदिरातही कार्तिकी एकादशी भक्तीभावात साजरी करण्यात आली. मध्यरात्रीनंतर बाहेर गावच्या प्रवाशांसाठी एसटीतर्फे जादा बसेस सोडण्यात आल्या.

देवरुखात रंगला कुत्रा अन् बिबट्याचा थरार

सीसीटीव्हित कैद, व्हिडीओ होतोय व्हायरल

देवरूख:- जंगलात भक्ष्य मिळत नसल्याने मिळेल ते अन्न मिळवून भूक भागवण्यासाठी बिबट्या आता मानवी वस्तीत घुसत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रे ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र देवरूखात कुत्र्यानेच बिबट्याला पळवून लावल्याचे दिसून आले. देवरूख मधील भर वस्तीत बिबटयाने रविवारी मध्यरात्री एन्ट्री केली. यावेळी बिबट्या कुत्र्यांवर झडप घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र कुत्र्यांनीच बिबट्याला पळवून लावत स्वतःची सुटका करून घेतली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

देवरूख कॉलेज मार्गावर मंदार मारुती भाटकर यांचे भर वस्तीत घर आहे. नेहमीप्रमाणे भाटकर यांनी कुत्र्यांना घराबाहेर बांधून ठेवले होते. त्यांना भक्ष्य करण्यासाठी बिबटया मध्यरात्री 1.30 वाजता घराच्या परिसरात आला. त्याने कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांनी भुंकत प्रतिकार केल्याने बिबटया त्यांच्या जवळ येऊ शकला नाही.
बिबटया आता शहरात शिरू लागल्याने वनविभागाने यावर उपायोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.