यावर्षीही चार होतकरू विद्यार्थ्यांचा गाव विकास समिती करणार शैक्षणिक खर्च

विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

घरातील आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या व वडिलांचे छत्र हरवलेल्या चार होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च गाव विकास समिती करणार असून नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप या विद्यार्थ्यांना संघटनेच्या वतीने करण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील करंबेले गावातील कु.सोहम संतोष गेल्ये,अक्षय धावडे,शैलेश धावडे,तेजस धावडे या विद्यार्थ्यांना गाव विकास समितीच्या वतीने शैक्षणिक मदत केली जाणार आहे.वडिलांचे छत्र हरवल्याने मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये व सदर विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेताना कोणत्याही शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये या हेतूने सामाजिक भावनेतून गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड,उपाध्यक्ष मंगेश धावडे,सरचिटणीस सुनील खंडागळे,देवरुख अध्यक्ष डॉ. मंगेश कांगणे यांच्या उपस्थितीत करंबेले गावात या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शैक्षणिक मदत करण्यात आली.गाव विकास समिती मार्फत दर वर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते.आर्थिक गोष्टींमुळे मुलांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये या भावनेतून गाव विकास समितीचे पदाधिकारी आपल्या उत्पन्नातुन समाजातील गरीब व होतकरू मुलांना शैक्षणिक मदत करत असतात.याच उपक्रमा अंतर्गत यावर्षी संगमेश्वर मधील करंबेले गावातील सोहम संतोष गेल्ये,शैलेश अरविंद धावडे अक्षय अरविंद धावडे आणि तेजस अरविंद धावडे या विद्यार्थ्यांना गाव विकास समितीच्या वतीने शैक्षणिक मदत करण्यात आली.एकाच कुटुंबातील तीनही भावडांना गाव विकास समितीने शैक्षणिक मदत केली असून या तिन्ही भावंडांच्या कुटुंबातील आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने गाव विकास समितीने त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.या विद्यार्थ्यांचा माध्यमिक शिक्षणापर्यंत चा शिक्षणाचा खर्च गाव विकास समिती करणार असल्याची माहिती संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी दिली आहे.

आठवीपासून जेईई, निटची तयारी करून घेणार- सतीश शेवडे

मुंबई, पुण्यात राहूनच नव्हे तर रत्नागिरीतही राहून ‘जेईई’मध्ये (मेन्स) यश मिळवणे शक्य आहे, हे एकाच वेळी पात्र ठरलेल्या 14 विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची ही पहिलीच तुकडी आहे. आता संस्थेच्या शाळांमध्ये आठवीपासून याची तयारी करून घेणार आहोत. संस्थेच्या चारही शाळांतील विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा महाविद्यालयाची अत्याधुनिक प्रयोगशाळाही दाखवण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी केले.

राष्ट्रीय पातळीवरील आयआयटी आणि एनआयटी या अभियांत्रिकी संस्थेतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई मेन्समध्ये यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. आज सायंकाळी राधाबाई शेट्ये सभागृहात कार्यक्रम झाला. तुषार पडिये (98.99), आयुष धुळप (98.92) आणि श्रेया तळेकर, आदित्य मगदूम, दिपाली पटेल, अनुज नागवेकर, सुयोग कोकजे, साक्षी शिंदे, अथर्व कदम, रोहित जोशी, पूर्वा घाणेकर, प्रथमेश गोराड, गायत्री जाधव, अद्वय देसाई यांचा सत्कार केला.

माजी कार्याध्यक्ष रमेश कीर म्हणाले, कोकणातील हे एक ऐतिहासिक यश आहे. पालकांच्या चेहेर्‍यावर आनंद पाहत होतो. कोकणातील सर्वांत जुनी व मोठी संस्था विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणासाठी उभी राहिल्याचे भान संस्थाचालकांना आहे. कोकण बोर्ड चालू झाल्यापासून सलग 8 वर्षे राज्यात अव्वल आहे. पण इथली मुले स्पर्धा परीक्षांतून पुढे जात नाहीत याची खंत होती. पण जेईईच्या निकालाने नक्कीच आयआयटीयन्स घडवू याची खात्री आहे. हा उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबवू.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अशा बुद्धीमान विद्यार्थ्यांच्या बळावर भारत महासत्ता होणार असल्याचे सांगितले. हे यश सुनियोजित प्रयत्नांतून मिळाले आहे. यापुढेही भरपूर यश मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. पालकांच्या वतीने डॉ. अभय धुळप यांनी मुंबईतील मित्रांच्या मुले आठवीपासून या परीक्षेची तयारी करत असल्याचे सांगितले. माझ्या मुलाला दहावीनंतर येथे संधी मिळाली. अनेक अडचणीतून वाट काढत हे केंद्र नक्कीच भरघोस यश मिळवेल, असा विश्‍वास व्यक्त केला. विद्यार्थी तुषार पडिये याने मनोगत व्यक्त केले.

या वेळी व्यासपीठावर डॉ. मकरंद साखळकर, प्रा. विशाखा सकपाळ, राजन मलुष्टे, वैद्य रघुवीर भिडे, मनोज पाटणकर, प्रा. उरुणकर, प्रा. चिंतामणी दामले आणि स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख प्रा. महेश नाईक उपस्थित होते.

देवरुख काॅलेजच्या मैदानावरुन सुखोई मिराज करणार उड्डाण १ फेब्रुवारीला एरोमाॅडेलींग शो.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पिञे महाविद्यालयाच्या मैदानात १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत इलेक्र्टिक मोटरवर उडणार्‍या विविध प्रकारच्या रेडीओ कंट्रोल विमानांची प्रात्यक्षिके मुलांना विनामुल्य पाहता येणार आहेत. देवरुख स्नेह परीवार व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचा हा उपक्रम आहे.
फ्लाईंग ईगल, ग्लायडर, उडता मासा, उडती तबकडी, ट्रेनर विमानांचे प्रात्यक्षिक पहायला मिळणार आहे. या बरोबरच भारतीय वायुसेनेतील मिराज-३०००,सुखोई-३०,व राफेल या लढाउ विमानांच्या रोमहर्षक कसरतींचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
प्रसिद्घ विमान छांदिष्ट सदानंद काळे यांचा हा शो आहे.अथर्व काळे हे विमाने उडवणार आहेत तर अक्षय काळे तांञिक बाजु सांभाळणार आहेत.
नुकतेच बालाकोटला भारताने एअर स्ट्राईक करुन अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले त्यात प्रमुख कामगिरी करणारे मिराज विमान,भारतीय वायुसेनेत नुकतेच दाखल झालेले राफेल व भारताच्या ताफ्यातील सर्वात अत्याधुनिक सुखोई-३० यांचे या एरोमाॅडेलिंग शो चे खास आकर्षण ठरणार आहे.या शोमधुन मुलांना विमानांची कार्यप्रणाली अभ्यासता येणार आहे.
भविष्यात हा शो पहाणारा विद्यार्थी पायलटही बनु शकतो असे या शोचे वैशिष्ट्य आहे.या शो साठी रुबीना चव्हाण,रेवा कदम ,युयुत्सु आर्ते,प्रमोद हर्डीकर,सुरेश गोखले,स्मिता गोखले,सदानंद भागवत सहकार्य करत आहेत.
या शो नंतर स्वतः प्रयोग करुन विमान छंद सुरु करण्यासाठी तीन आकर्षक उडणार्‍या विमानांचा संच ५०० रुपयात उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

खरडेवाडी कला किडा मंडळ मुंबई (मेर्वी) तर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण

रत्नागिरी तालुक्यातील खरडेवाडी कला किडा मंडळ मुंबई (मेर्वी) तर्फे मेर्वी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष कडवईकर मंडळाचे अध्यक्ष सखाराम खरडे उपाध्यक्ष अर्जुन खरडे सरचिटणीस सत्यवान भोसले कार्याध्यक्ष विश्वनाथ नवाले उपाध्यक्ष शैलेश खरडे चिटणीस मिनेश भोसले विनोद खरडे सचिव प्रकाश खरडे अध्यापक बाबाजी कुरतडकर अरविंद वाघचवरे संतोष कडवईकर शंकर वरक स्नेहल कांबळे राजेशकुमार गुरव आणि पांडुरंग भोसले सुनील खरडे शांताराम नवाले वैभव खरडे अनिल नवाले भिकाजी भोसले राजाराम भोसले सायली खरडे नेहा खरडे गोपाळ नवाले विलास खरडे सहदेव खरडे आदि मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
तसेच त्यानंतर मेर्वी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा मंडळाच्यावतीने आयोजित केली होती. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष कडवईकर म्हणाले की खरडेवाडी कला किडा मंडळ मुंबई (मेर्वी) तर्फे विद्यार्थ्यांना कलेला संधी उपलब्ध करून दिली आहे. हे मंडळ शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहेत.असे प्रतिपादन केले
शेवटी सत्यवान भोसले यांनी आभार प्रदर्शन केले आणि समारंभाची सांगता झाली

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

आणखी आठजण कोरोना बाधित; रुग्णसंख्या 183 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. संध्याकाळी 14 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर आताच आणखी आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या आठ जणांपैकी रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर येथील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संंख्या 183 वर पोहोचली आहे.

रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरीतील 6 आणि संगमेश्वर येथील दोन असे 8 अहवाल प्राप्‍त झाले आहेत हे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात एकूण 22 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 183 इतकी झाली आहे. रत्नागिरीत सापडलेल्या सहा पॉझिटीव्ह रुग्णांपैकी चार रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सातत्याने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्ण संख्येने जिल्हावासीय धास्तावले असून जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या द्विशतकानजिक पोहोचली आहे.