गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे रविवारी उत्कर्ष कुणबी संस्थेच्या व्यासपीठावर

उत्कर्ष कुणबी आयोजित गावकर परिषदेला राहणार उपस्थित

उत्कर्ष कुणबी संस्था तर्फे साखरपा येथे पंचक्रोशी विभागातील कुणबी समाजाच्या गावकरांची गावकर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजकांनी निमंत्रित केले आहे.
येथील उत्कर्ष कुणबी संस्थाचे सह सचिव दयानंद चिंचवळकर यांनी याबाबतचे निमंत्रण गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांना दिले आहे. संस्थे मार्फत आयोजित करण्यात आलेल्या गावकर परिषद या कार्यक्रमासाठी संघटनेच्या पदाधिकारी यांनी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले आहे.16 फेब्रुवारी ला रविवारी सकाळी 11 वाजता ही गावकर परिषद साखरपा येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत पंचक्रोशी तील गावांचे गावकर आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती या संघटनेचे प्रचारप्रमुख सतेश जाधव यांनी दिली आहे.

अखेर तीने उक्षीचा निरोप घेतला…

आजीजा काझी ही उक्षी गावातील एक गरीब स्त्री.थोडे मानसिकतेमुळे तीने आपले जीवन रस्त्यावर,,पाण्यात,थंडी उन्हाळ्यात काढले.गावातील रस्ता स्वच्छ करण्यात तीचा पुढाकार.लोकांकडे मागून खायची.आणि गावातील लोक तीला जेवण देण्यासाठी तीची वाट पाहायची.वय वर्ष 70 च्या पुढे.तशी तबीयतने हट्टी खट्टी , पण 15/20 दिवसा पूर्वी तीच्या पायाला जखम झाली आणि ते निमित्त ठरले.जखम झाल्या मुळे पायात किडे झाले होते.मी बाहेर होतो मला गावातून माझ्या सहकार्याचा फोन आला.असे असे झालेय.मी म्हणालो तीला रत्नागिरीत सिव्हिल ला नेण्याची तयारी करा मी रुग्णवाहिका घेवून पोचतोच.पण त्या पुर्वी मुनाफ खतीब आणि गावातील काही लोकांनी तीला प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री निले होते.पण पुढील उपचारासाठी रत्नागिरी घेवून जा असा सल्ला डाॅक्टर ने दिला होता.मी व माझ्या सहकार्यानी तीला गाडीत घालून रत्नागिरी सिव्हिल निली. थोडी मानसिकरूग्ण असल्याने तेथील डाॅक्टर कानडोळा करत होते.मात्र राजू भाटलेकर या माझ्या मित्रांने दणका देताच उपचार सुरू झाले.तीला स्पेशल रूम रत्नागिरी सिव्हिल मध्ये घेवून दिले.थोडे दिवसाने ती बरी झाली.रमजान गोलंदाजी, मुनाफ खतीब,राजू भाटलेकर आम्ही सर्व सिव्हिल सर्जनला भेटलो.तीची विचारपुस केली तीची जखम सुखेल ती बरी होईल असा आशावाद डाॅ.सुभाष चव्हाण यांनी दिला.तीला बर वाटल्यावर ती परत गावात फिरू नये यासाठी आम्ही तीला रत्नागिरी मनोरूग्णालयात नेण्याचे ठरवले.जखम सुकली की ती परत पाण्यात नाचेल,मागून खाईल म्हणून राहीलेले आयुष्य तीने मनोरूग्णालयात काढू दे अस आम्ही ठरवले.पण काही दिवसात ती बरी झाली.आम्ही भेटायला जायचो तेव्हा ती म्हणायची आता आणलात तसे उक्षी घेवून चला.माझे खुप काम आहे.तीने हुशारी दाखवली आम्हाला खुप बर वाटलं.पण 2 दिवसाने तीची तबीयत बिघडली .शरीराने तीची साथ सोडली,अन्न पाणी बंद झालं.श्वास घेण्यात अडचणी निर्माण झाल्या.तिला ऑक्सिजन लावण्यात आले.पण नशीबाची साथ सुटली कि कोणीच काय करू शकत नाही तो दिवस उजाडला आणि आमच्या लाडक्या आजीजाने उक्षीचा अखेरचा निरोप घेतला.
तिचे कोणीच नाही.पण जे लांबचे नातेवाईक होते त्यानी व सिव्हिलच्या डाॅक्टर व इतर कर्मचारींनी खुप मेहनत घेतली.ज्यांनी ज्यांनी तिच्या साठी घेतले आहेत.त्या सर्वांचे मी रमजान गोलंदाज उक्षी गावाच्या वतीने आभार मानतो.
आजीजा काझीचा अंतविधी आज सकाळी 10:00 उक्षी येथे होणार अल्लाह तिला जन्नत नसीब करो दुआ करावी .

शशांक घडशी यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान.

तालुक्यातील सर्वांसाठी अभिमान ठरणारा राज्य शासनाचा मानाचा समजला जाणारा जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देवरूखातील तायक्वांडोचे प्रमुख मार्गदर्शक शशांक घडशी यांना जिल्हा पालकमंत्री ना.अनिल परब यांचे हस्ते प्रदान करणेत आला त्यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण.जिल्हा क्रीडा अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते
संगमेश्वर तालुक्यात ज्यांनी अहोरात्र मेहनत करून गेली 20वर्षे संगमेश्वर तालुक्यामध्ये ज्या खेळाचा प्रसार केला अश्या तायक्वोँडो या कोरियन मार्शल आर्ट खेळाचे प्रशिक्षक शशांक शांताराम घडशी यांना
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 2020. मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे
संगमेश्वर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील पहिला पुरस्कार म्हणून बहुमान मिळवणारी पहिली व्यक्ती घडशी ठरले आहेत
तसेच तायक्वोँदो क्षेत्रातील जिल्ह्याच्या इतीहासातील पहिला पुरस्कार म्हणून बहुमान मिळवणारी पहिली व्यक्ती हि घडशीच ठरले आहेत
त्यांना पुरस्कार प्रदान केलेवर त्यांचे जि प अध्यक्ष रोहन बने जिल्हा प्रमुख विलास चाळके महिला बालकल्याण सभापती सौ रजनी चिंगळे पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश सप्रे आदींनी अभिनंदन केले

माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय गुरव यांचा फेर निवड.

रत्नागिरी जिल्हा बीएड धारक माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी देवरुख न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक संजय चंद्रकांत गुरव यांची फेर निवड करण्यात आली आहे.
देवरूखीत पार पडलेल्या माध्यमिक संघाच्या कार्यकारिणी निवड बैठकीत हि निवड करण्यात आली. यावेळी गेली दोन वर्षे संघाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळल्याबद्दल संघटनेच्या सभासदांनी सर्वानुमते गुरव यांची फेरनिवड केली.
यावेळी संघाची नूतन कार्यकारिणी देखील तयार करण्यात आली. यात उपाध्यक्ष म्हणून इलाही मुलाणी (माने विद्यालय, भांबेड),सुनिल देशमाने (कान्हेरे विद्यालय आयनी) यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून शिवाजी बणगर (सोनावडे हायस्कूल), कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे (पटर्वधन हायस्कूल रत्नागिरी) यांची वर्णी लावण्यात आली आहे.
महिला आघाडी प्रमुख म्हणून सिध्दी लांजेकर( सैतवडे हायस्कूल), सदस्य म्हणून विजयकुमार गुरव (बुरंबी), अल्मिन शेख (फुरुस), प्रकाश पाटील (कुटरे), अरुण कुराडे (कोंडे), मारुती चौगुले (कसोप), धनाजी गिरी ( आबलोली), योगेश शेट्ये (हरचिरी) यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व नूतन पदाधिकारी यांचे संघटनेच्यावतीने अभिनंदन करणेत येवू त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे काम करताना सदस्यांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवण्यावर भर देणार असून शासनस्तरावरील मागण्यांसाठी राज्य संघटनेशी पाठपुरावा करून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे .गुरव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले

डीजीके महाविदयालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती.

भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला-वाणिज्य-विज्ञान वरिष्ठ महाविदयालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस प्रभारी प्राचार्य सीएमए प्रा उदय बोडस व महाविदयालयाचा सचिव कौस्तुभ फाटक यांनी पुष्पहार अर्पण केला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सीएमए प्रा उदय बोडस उपस्थित होते. यानंतर प्रभारी प्राचार्य सीएमए प्रा उदय बोडस यांनी आपल्या मनोगतांतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा परिचय करुन दिला.या वेळी इतिहास विभाग प्रमुख रिया बंडबे, अन्य प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचीत महिला व बालकल्याण सभापती सौ रजनीताई चिंगळे यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी यांच्या पाठीवर पक्षप्रमुखांनी कौतुकाची थाप मारत दिलेली जबाबदारी चोख बजावत सर्व सामान्य महिलांना न्याय देण्याच काम करा असे सांगितले
या भेटीच्या वेळा त्यांचे सोबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासह माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते सुभाष बने यांचे सुपुत्र जिपचे अध्यक्ष रोहन बने सहसंर्पक प्रमूख राजू महाडीक जिल्हा प्रमुख विलास चाळके आदि मान्यवर उपस्थित होते
सौ.रजनीताई या संगमेश्‍वर तालुक्यातील दाभोळ जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधीत्व करतात. यावेळी सभापतीपदासाठी त्यांना संधी देण्यात आली. त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. जि. प. सभापतीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रथमच सौ रजनीताई यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.

उध्दव ठाकरे यांनी रजनीताईंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत अशी आपल्या सारखी नविन पिढी शिवसेनेच्या रूपाने राजकारणात येत आहे ही कौतुकास्पद गोष्ट असून मिळालेल्या कालावधीचा सदुपयोग करून जिल्ह्यात आपल्या कामाची छाप पाड असा सल्ला दिला. लागेल त्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून आपण सदैव पाठीशी राहू अशी ग्वाहीही त्यांनी सौ चिंगळेंना दिली. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांचे आभार मानत शिवसेना या चार अक्षरांमुळेच आपल्यासारखी सामान्य महिला जिल्हा परिषदेत सभापती होऊ शकलीअसे सांगत वर्षभराच्या कालावधीत आपण जिल्हा परिषदेच्या मार्फत जिल्ह्यातील महिलांना स्वताच्या पायावर उभे करतानाच त्यांना सन्मानपण मिळविणेसाठी बदल घडवून महिला सक्षिमाकरणावर भर देवू असे सांगितले.
…………………

अभाविप चा युवक सप्ताह उत्साहात संपन्न

१२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवा शक्तिमध्ये जागृती व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून रत्नागिरी शहरात युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.१२ जानेवारी ते ३० जानेवारी या काळात अभाविप चा युवक सप्ताह यशस्वी सम्पन्न झाला.रत्नागिरी शहरातील सर्व वसतिगृह आणि महाविद्यालयापर्यंत सम्पर्क करत व्यक्तिमत्त्व विकास,कौशल्यधिष्ठित शिक्षण, मिशन 2020,स्वामी विवेकानंद आणि भविष्यातील भारत,प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सुमारे २००० पेक्षा जास्त विद्यार्थी या काळात युवक सप्ताहात सहभागी झाले होते.अभाविप चा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यन्त प्रेरणादायी होता आणि मोठा प्रतिसाद या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दिला असे रत्नागिरी शहरमंत्री हृषीकेश वैद्य याने सांगितले.स्वरूप काणे याने यांनी युवक सप्ताह प्रमुख अशी जबाबदारी घेत जिल्ह्यात तर ईशान पाळेकर याने शहरात प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केले.

कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप रत्नागिरीतही पूर्णतः यशस्वी.

वाजवी वेतनवाढ मिळावी व सेवा – शर्तीमध्ये सुधारणा कराव्यात या मागण्यांसाठी पुकारलेला बैंक कर्मचाऱ्यांचा आजचा संप पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांनी केला . आज व उद्या – ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी असा दाना दिवस करण्यात येणाऱ्या संपाचा आजचा पहिला दिवस होता . . बँकींग उद्योगातील शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नऊच्या नऊ संघटनांनी या संपामध्ये भाग घेतला होता . देशभरात सुमारे १० लाख तर महाराष्ट्र राज्यात जवळपास ४० हजार बक कर्मचारी व अधिकारी या संपामध्ये सहभागी झाले होते . २७ महिने प्रलंबित असलेला बँक कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा ११वा द्विपक्ष करार त्वरीत संपन्न करा ही प्रमुख मागणी या संपात आयबीएकडे करण्यात आली आहे . संपाच्या एक दिवस आधी म्हणजे ३० जानेवारीला झालेल्या वाटाघाटीही निष्फळ ठरल्या . पुन्हा एकदा असमाधानकारक वेतनवाढीचा प्रस्ताव आयबीएने दिला आहे . त्यामुळे बँक कर्मचारी संघटनांना नाईलाजाने हा संप करावा लागत आहे . वेतनवाढीच्या मागणीबरोबरच नवीन पेन्शन योजना रद्द करावी , सर्वांसाठी जुनी पेन्शन योजना चालू करावी , पाच दिवसांचा आठवडा करावा , पेन्शन अद्ययावत करणे , फॅमिली पेन्शनमध्ये सुधार , समान कामाचे समान वेतन या व इतरही मागण्या या संपात करण्यात आल्या आहेत , ज्या आयबीए मान्य करायला तयार नाही . या दोन दिवसांच्या संपानंतर जर आयबीएने पुढाकार घेऊन वेतनवाढीचा ११वा करार संपन्न केला नाही तर ११ ते १३ मार्च असा तीन दिवस व ०१ एप्रिल २०२० पासून बेमुदत संप करण्यात येईल असे संघटना प्रतिनिधींनी जाहीर केले . रत्नागिरीमध्ये संपकरी बँक कर्मचारी व अधिकारी यांनी सकाळी बँक ऑफ महाराष्ट्रसमोर गाडीतळ येथे एकत्रित येऊन आपला संताप व्यक्त करणारी जोरदार निदर्शने केली . निदर्शनांचे नेतृत्व व संपकरी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन राजेंद्र गडवी , विनोद आठवले , विनोद कदम , विश्वनाथ आडारकर व संतोष कुलकर्णी यांनी केले .

सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत नवनिर्मितीने भरले महामार्गावरील खड्डे.

सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत सामाजिक,आरोग्य,कला,
शैक्षणिक,क्रिडा,पर्यावरण आदि.क्षेत्रात कार्यरत असणारे नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षी आज एल्गार पुकारत राष्ट्रीय महामार्ग पडलेल्या खड्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सुजान नागरीक,स्कूलचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक , महीला आदिसह संबंधित विभागाला जाग यावी म्हणून महामार्गावरील खड्डे भरले आहेत.या सामाजिक उपक्रमांचे जनतेतून स्वागत आणि कौतुक होत आहे.

राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून रस्त्यात खड्डे की खड्ड रस्ते असे प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. महामार्गावर गाडी चालवणे सोडा नीट चालता ही येत नाही.फुट भर पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यात कशी गाडी चालवायची असा संतप्त सवाल वाहन चालक विचारत आहे.या पडलेल्या खड्ड्यांचा त्रास फक्त वाहन चालकांना होत नसून सर्व सामान्यांना ही होत आहे.महामार्गावर काचा वरती करून एसीतून फिरणारे मंत्री व अधिकारी वर्गाला हे दिसत नाहीत का? असा सवाल उपस्थित केला आहे.या महामार्गावरील खड्ड्यानी 4 बळी पडले असून अनेकांची हाडे मोडली आहेत.अजून किती दिवस सहन करायचे. गणपतीच्या कोकणातल्या सर्वात मोठ्या उत्सवानिमित्त येणारे चाकर मानींना पण खड्ड्यातून यावे लागले.गणरायांचे विसरजण पण या खड्ड्यातूनच करावे.आता किती दिवस या महामार्गावरील सागरातुन प्रवास करायचा त्यामुळे याचा निषेध म्हणून नवनिर्मिती फाऊंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावर आंबेड बु. येथे दिड फूट पडलेल्या खड्डे भरून निषेध करणार केला आहे..या कार्यक्रमाला नवनिर्मिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज,अमोल पाटणे, अतिश पाटणे,राजेश आंबेकर,सलाउद्दीन बोट,विनायक खातु,रिजवान केळकर,राजेंद्र पोमेंडकर,सलीम सय्यद,दिलावर फकीर, दानिश बोट,मेहराज बोट,संजय आग्रे ,आदिसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त केला नाही तर आठ दिवसात मोठे आंदोलन उभारू असा इशाराही देण्यात आलाय.

गाव विकास समितीने दूर केली जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय.

जमिनीच्या_ओलाव्यामुळे विद्यार्थ्यांची होत होती गैरसोय,समस्या लक्षात घेऊन गाव विकास समितीकडून तातडीने 10 बेंच देऊन मदतीचा हात.

गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या पुढाकाराने पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात भेडसावणाऱ्या जमीन ओळव्यापासून ,संभाव्य आजारांपासून सुरक्षा मिळाली असून गाव विकास समितीने या मराठी शाळेला दहा बेंच भेट देऊन मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.याबाबत गावातील नागरिकांनी संघटनेचे आभार मानले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी शाळा 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्ग खोल्यांच्या जमिनीला ओलावा मारत असल्याने वर्गात बसणाऱ्या मुलांची गैरसोय व ओळव्यामुळे पावसाळ्यात आजारी पडणारी मुले याबाबत पालक वर्गाने गाव विकास समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता.शाळेने देखील बेंच ची मागणी केली होती.नंतर गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे,राहुल यादव यांच्या सूचनेनुसार स्थानिक पदाधिकारी डॉ. मंगेश कांगणे,अमित गमरे,दिक्षा खंडागळे, अनघा कांगणे,मनोज घुग,प्रशांत घुग यांनी पांगरी येथील प्राथमिक शाळायेथे भेट देऊन समस्या समजून घेतली व येथील विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास होणारी गैरसोय लक्षात घेतली. संघटनेच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत सदर शाळेला आवश्यक असणाऱ्या 10 बेंच देण्याचा निर्णय घेण्यात आला व 22 डिसेंम्बर रोजी गाव विकास समितीचे पदाधिकारी यांनी स्वतः जाऊन पांगरी येथील मराठी शाळेस दहा बेंच मदत म्हणून भेट दिल्या.गाव विकास समिती या तरुणांच्या संघटनेने केलेल्या या कार्याबाबत पांगरी वासीयांनी 24 डिसेंबर रोजी पार पडलेल्या शाळा शताब्दी उत्सवात गाव विकास समिती च्या संघटनेचे आभार मानले व यथोचित सन्मान केला.जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारावा या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी भूमिका गाव विकास समितीचे देवरुख शहर अध्यक्ष डॉ. मंगेश कांगणे यांनी यावेळी व्यक्त केली.संघटनेच्या महिला संघटना अध्यक्ष सौ दिक्षा खंडागळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्याकरिता नियोजन बद्ध धोरण शासनाने तयार करणे आवश्यक आहे असे म्हटले.यावेळी गाव विकास समितीचे पदाधिकारी संगमेश्वर तालुका कार्याध्यक्ष अमित गमरे ,देवरुख शहर अध्यक्ष डॉ मंगेश कांगणे,महिला अध्यक्षा दिक्षा खंडागळे, उपाध्यक्षा अनघा कांगणे, जिल्हा संघटक मनोज घुग आदीसह शिक्षक व पालक उपस्थित होते. गाव विकास समितीच्या अनघा कांगणे व राजेश कांगणे यांचे विशेष सहकार्य गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा ही तरुणांची संघटना स्वतः सहकारातून समाजातील अनेक गरजूंना सहकार्य करत असते,संघटना कुणाकडून ही देणगी न घेता संघटनेचे पदाधिकारी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या उत्पन्नतील रक्कम बाजूला करून संघटना म्हणून हे उपक्रम राबवत असते.अनेक लोकोपयोगी आंदोलन, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या संघटनेने पांगरी मराठी शाळेला नुकतीच 25 हजार किमतीची बसण्याची 10 बाके दिली.या लोकोपयोगी उपक्रमास गाव विकास समितीच्या महिला उपाध्यक्ष सौ अनघा कांगणे व त्यांचे पती राजेश कांगणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.गाव विकास समितीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील तरुण,तरुणी महिला सामाजिक परिवर्तन करण्यासाठी सढळ हस्ते मदत करण्यास पुढे येत आहेत ही आशादायक गोष्ट असल्याचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी म्हटले असून आता ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने सजक होईल असे त्यांनी म्हटले आहे.