रत्नागिरी:- जे जे स्कुल ऑफ आर्टच्या सहकार्याने रत्नागिरी नाविन्यपूर्ण पर्यटन शहर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी शहराचे प्रवेशद्वार साळवी स्टॉप ते मांडवी किनारा या भागातील विविध ठिकाणांची पाहणी जे जेच्या पथकाकडून केली. यासाठी शासनाकडून एक कोटी आणि पालिकेकडून निधी मंजूर केला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, रत्नागिरी शहराच्या सुरवातीपासून ते मांडवी किनार्यपर्यंत शहरातील प्रत्येक ठिकाणाला वेगळा लुक असावा
यासाठी जे जे स्कुल ऑफ आर्टच्या सहकार्याने काम केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली गेली. शहरातील मारुती मंदिर सर्कलसाठी 1 कोटी रुपये, साळवी स्टॉप येथील कमानीसाठी 30 ते 35 लाख रुपये निधी मंजूर आहे. तसेच सावकर चौक, आंबेडकर पूतळा, जयस्तंभ येथील चौकांच्या सुशोभिकरणासाठी यंत्रणा राबत आहे. यातून रत्नागिरी शहाला पर्यटनाचा नवा साज दिले जाईल. पर्यटन विभागासह जिल्हा नियोजनमधून हा निधी मिळणार आहे. तसेच मांडवी, भाट्ये बीचवर जे जे च्या बेस्ट मटेरिअलमधून कायमस्वरुपी सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थी काम करत आहेत. शहरातील थिबा पॅलेसमध्ये मे महिन्यात म्युझिअम सुरु होईल. जे. जे. तर्फे मुंबई भरवण्यात येणार्या म्युझिअममध्ये ज्या प्रतिकृती ठेवल्या जातात, त्या थिबापॅलेसमध्ये पहायला मिळणार आहेत. कोविडनंतर निधीची कमतरता पडणार नाही असे जाहीर केले होते. त्यानुसार ही कामे सुरु आहेत. रत्नागिरी महाराष्ट्रातील नामवंत शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.