रत्नागिरी:-कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सध्या देश लॉकडाऊन असला तरीही अनेक लोकं क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडताना दिसतात. विनाकारण घराबाहेर पडू नका असं वारंवार सांगितलं जातं, सरकार वारंवार सांगत आहे, तसेच अनेक सेलिब्रिटीही हा संदेश देतात, मात्र लोकं ऐकत नाहीत. दरम्यान रत्नागिरीतील प्राध्यापक तसेच चित्रकलेची आवड असणाऱ्या स्वप्नजा मोहिते यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून घराबाहेर न पडण्याचा संदेश दिला आहे.
स्वप्नजा मोहिते यांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटलेल्या चित्रांमध्ये घराबाहेर पडलात तर किती धोका आहे हे सांगितलं असून, तुमची पावलं लक्ष्मण रेषेच्या आतच असावीत, ही लक्ष्मण रेषा ओलांडता कामा नये, नाहीतर बाहेर मोठ संकट आहे, तुम्ही घरी सुरक्षित आहात, हेच या चित्रांंच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्ना स्वप्नजा मोहीते यांनी केला आहे. या चित्रांची त्यांनी शॉर्टफिल्म बनवली असून त्यामाध्यमातून त्यांनी हा संदेश दिला आहे..