रत्नागिरी:- मोठ्या शहरांमध्ये कोरोना वेगाने वाढत असताना रत्नागिरीत देखील कोरोना हळूहळू पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. मागील 24 तासात एकट्या रत्नागिरी तालुक्यात 12 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कमी झालेला धोका पुन्हा वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे सातत्याने रुग्ण सापडून येत आहेत. याशिवाय उपचारा दरम्यान मृत्यू देखील वाढत आहेत.
मागील 24 तासात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या रुग्णांपैकी 12 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या 12 रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण शहर आणि परिसरातील आहेत. यामध्ये सन्मित्रनगर, शिवाजी नगर, नरहर वसाहत, तळसुंदे, जेलरोड, नाचणे, पावस, आंबेडकरवाडी, चैतन्यनगर, चिपळूण पेठमाप आणि दापोली येथे रुग्ण सापडले आहेत.