रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकार क्षेत्रातील बँकींग फ्रंटीयर्स या नामवंत संस्थेचा 2019-20 करिताचा बेस्ट इनव्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह हा देशपातळीवरील पुरस्कार बंगलोर येथे पार पडलेल्या ऑनलाईन समारंभात प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला पुरूषोत्तम रूपाला, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतिश मराठे व नाबार्डचे चेअरमन जी. आर. चिंताला आदी उपस्थित होते. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये अग्रगण्य मानण्यात येणार्या रत्नागिरी जिल्हा बँकेला, यापुर्वी मिळालेल्या राज्य व देश पातळीवरील पुरस्कारांत या पुरस्काराने भर पडली. सर्व जिल्हा भरातील सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त केले. या बँकेला यापुर्वी राज्य शासनाकडून सहकारनिष्ठ व सहकारभुषण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनासदृष्य परिस्थितीतही व्यवसायात सातत्य राखुन, बँकेने उत्कृष्ठरित्या नियोजन करून एन. पी. ए. व थकबाकी वसुली प्रभावीपणे केली. ठेवीमध्ये वृध्दी करण्यात बँक यशस्वी झालेली आहे. सद्यस्थितीतील बँकींग क्षेत्रात असलेल्या स्पर्धेमध्ये टिकून राहुन सर्व आव्हानांवर लिलया मात करून योग्य ठिकाणी व फायदेशीर गुंतवणुक केलेली आहे. या सर्वांचा विचार करून देशातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या विभागातील बेस्ट इनव्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह’ या पुरस्काराकरिता रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेची निवड करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक मंडळाचे योग्य नियोजनामुळे, तसेच बँकेच्या अधिकार्यांना केलेले योग्य मार्गदर्शन, यामुळेच हा पुरस्कार मिळाला असे बँकेचे कार्यकारी संचालक सुनिल गुरव यांनी सांगितले.