चिपळूण – दापोली आणि खेड तालुक्यातील नद्या व खाड्यांमध्ये वाळूची बेसुमार लुट सुरू आहे. त्याचा जिल्ह्यातील निसर्ग आणि पर्यावरणाला धोका आहे. राज्य सरकारने महसूल, वन आणि पर्यावरण विभागामार्फत समिती नेमून नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा करणार्यांवर कायदेशीर कारवाई करवी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कबीर कटमाले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या आशीर्वादाने अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याचा आरोपही श्री. कटमाले यांनी केला आहे.
कटमाले यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्वर, आणि रत्नागिरी तालुक्यातील काही राजकीय पुढारी व शासकीय अधिकारी यांच्या संगमताने या सर्व तालुक्यातील विविध गावं गावी बेकायदेशीर वाळू उपशा व वाहतूक दिवस-रात्र जोरात चालू आहे. बेकायदा वाळू उपसा करणार्यांनी जिल्ह्यातील कुठलीही खाडी व नदीपात्र शिल्लक ठेवलेली नाही. दापोली तालुक्यातील दाभीळ पंगारी खाडीमध्ये अनेक महिने सक्शन पंपाद्वारे वाळू उपशा होत होता. आता हातपाटी परवाना घेवून 4 ठिकाणी सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा सुरू आहे. बारजेसद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे. शासनाच्या धोरणानुसार संक्शन पंप पद्धतीचा अवलंब करण्यास सक्त मनाई केलेली आहे. नैसर्गिक संपत्तीस व पर्यावरणला धोका निर्माण झाला आहे व खाडी किनाया खारफुटीचे (मॅगरोज) झाडांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करणार्यास राज्यात बंदी आहे. तरीही सेक्शन लावून वाळू उपसा केला जात आहे. राज्य सरकारने समितीमार्फत चौकशी करून हातपाटीच्या नावाखाली सक्शन लावणार्यांचे परवाने रद्द करावे अशी मागणी श्री. कटमाले यांनी केली आहे.
खेड तालुक्यातील कर्जी, मुमका ,आमशेत, चिपळूण तालुक्यामधे ग्रागंई (सुतवी बंदर) , दोणवली , चिवेळी, मालदोली येथे दिवसा 200 ब्रास वाळूचा उपसा व विक्री चालू आहे. चिपळूण तालुक्यातील नदी व खाड्यांमध्येही ठिकाणी बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. खेड तालुक्यातील निरभाडे, आंबडस परिसरात जेसीपीच्या सहायाने नदीपात्रात वाळू उपसा सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील भातगाव, डिंगणी, करजूवे, माखजन येथे संक्शन पंपाद्वारे आणि हातपाटीद्वारे बेकायदेशीर वाळू उत्खनन होत आहे.