जिल्ह्यातील 324 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा दावा

 ना. उदय सामंत; शिवसैनिकांच्या जोरावर यश

रत्नागिरी:-  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींंपैकी ३२४ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्याचा दावा शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी केला आहे. या ग्रामपंचायतींवर शिवसेनेत सरपंच विराजमान होईल असेही त्यांनी जाहीर केले आहे.जिल्ह्यात शिवसैनिकांच्या जोरावर विजय  मिळवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका एकाचवेळी घेण्यात आल्या. मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतीच्या  निवडणूकांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झाले. त्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन ना.सामंत यांनी जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील एकूण ४७९ पैकी  ३२४  शिवसेना, ५२  राष्ट्रवादी, १४ भाजप, ७५ गाव पॅनेल, १ काँग्रेस, ३  मनसे,  ६ महाविकास आघाडी, ३ ग्रामपंचायती  इतर पक्षाना मिळाल्या आहेत.  राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आहे. कोरोनामुळे  सध्या विकास कामे ठप्प असलेली तरी कोरोना कालावधीत मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या समाधानकारक कामामुळे ग्रामीण भागातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. हे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकातून  स्पष्ट झाल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यात ५३ पैकी शिवसेना ४५, भाजप २,  गाव पॅनेल ३, इतर पक्षाना ३ ग्रामपंचायती ताब्यात मिळाल्या आहेत.  लांजा तालुक्यात २३ पैकी १२ शिवसेना, राष्ट्रवादी २, गाव पॅनेल  ९,  राजापूर तालुक्यात ५१ पैकी ३५ शिवसेना, राष्ट्रवादी १, भाजप ४, गाव पॅनल ९, मनसे २, संगमेश्वर तालुक्यात ८१ पैकी ५२ शिवसेना, राष्ट्रवादी ८ , भाजप २, गाव पॅनेल १८, काँग्रेस १, मंडणगड तालुक्यात १५ पैकी ११ शिवसेना, ३  राष्ट्रवादी, १गाव पॅनेल, दापोली तालुक्यात ५७ पैकी ४१ शिवसेना, १३ राष्ट्रवादी , १  भाजप,  दोन गाव पॅनल, चिपळूण तालुक्यात ८३ पैकी ३४ शिवसेना, १३ राष्ट्रवादी,  १ भाजप, गाव पॅनेल ३०,  महाविकास आघाडी ५, गुहागर तालुक्यात २९ पैकी २२ शिवसेना, ४ भाजप, ३ गाव पॅनेल,  खेड तालुक्यात ८७ पैकी ७२ शिवसेना, १२ राष्ट्रवादी,  मनसे १ , महाविकासआघाडी १असे यश प्राप्त झाले आहे असेही ना. सामंत यांनी सांगितले.