रत्नागिरी:- शिवखोल येथे आढलेल्या कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ जणांना जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकूण ३२ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या चौघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये जिल्हा कारागृहातील एकाचा समावेश आहे. पहिला पॉझेटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाला असून नव्या पॉझेटिव्ह रुग्णासह एकूण २० जण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाचा पहिला पॉझेटिव्ह रुग्ण शृंगारतळी येथे सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली होती. त्यानंतर जवळजवळ सर्वच रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. जिल्हा कोरोना मुक्त होत असतानाच दिल्ली नजिकच्या निजामुद्दीन मरकज येथून आलेला एकजण पा@झेटिव्ह आढळयामुळे यंत्रणेचे तारांबळ उडाली आहे.
राजीवड्या नजिकच्या शिवखोल येथील पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वाबचे नमुने शुक्रवारी रात्री तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. रात्रीउशीरापर्यंत त्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे. तर गुरुवारी नमुने पाठविलेल्या ४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हा रुग्णालयात एकूण २० रुग्ण त्यापैकी केवळ एकच पॉझेटिव्ह आहे. गुहागर २, कळबणी ७, संगमेश्वर २, दापोली २ असे एकूण ३२ रुग्ण जिल्ह्यात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.