रत्नागिरी पोलिसांकडून भाट्ये बीचवर स्वच्छता मोहीम 

रत्नागिरी:- रत्नागिरी पोलिसांकडून शनिवारी शहरालगतच्या भाट्ये बीच येथे एक दिवसिय स्वच्छता मोहिम राबविण्यात आल़ी. यावेळी शहर पोलीस निरिक्षक अनिल लाड तसेच शहर पोलीस ठाणे व मुख्यालयातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होत़े. यावेळी सम्पूर्ण भाट्ये बिचवरील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

रत्नागिरी जिह्यातील भाट्ये बीच हे महत्वाचे पर्यटन स्थळ आह़े. राज्यभरातून पर्यटक याठिकाणी फिरण्यासाठी येत असतात़. शहरालगत असलेल्या या बीचवर स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटक यांची रेलचेल मोठया संख्येने असल्याने मोठया प्रमाणावर कचरा देखील जमा होतो. अनेकदा पर्यटक कचरा बिचवरच टाकून निघून जातात यामुळे बीचवर मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य होते. 

 भाट्ये बिचवर कचऱ्याचे साम्राज्य असल्याने बीचवर भेट देणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधी व अस्वच्छतेला सामोरे जावे लागत़े. या गोष्टीचा विचार करून रत्नागिरी पोलिसांकडून याठिकाणी स्वच्छता मोहिम आखण्यात आली होत़ी. शनिवारी सकाळी रत्नागिरी पोलीस दलातील कर्मचारी भाट्ये बीच येथे दाखल झाले होत़े. बीचवर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, खाऊचे कादग आदींची साफसफाई करण्यात आल़ी