एमआयडीसीतील एकाच कंपनीत सापडले 10 कोरोना पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 18 वर

रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसीमधील एका कंपनीत आज तब्बल 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे कामगार बाहेरील जिल्ह्यातील असल्याचे समजते. 

मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले होते. अशातच रत्नागिरी एमआयडीसी येथील कंपनीत एकाचवेळी 10 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कंपनीतील  कामगारांची गुरुवारी अँटीजेन तपासणी करण्यात आली. यावेळी 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. बाधित 10 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून कंपनी सॅनिटाईझ करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.