कोरोनाची लाट ओसरली; जिल्ह्यात केवळ आठ पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात आलेली कोरोना आजाराची लाट ओसरल्याचे चित्र आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात अवघे आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. नव्याने आठ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 468 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 179 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 48 हजार 989 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

सोमवारी 13 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 7 हजार 914 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाचाही मृत्यू झालेला नाही.