रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात केवळ 12 बाधित रुग्ण सापडले आहेत. चोवीस तासात 131 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
शुक्रवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 131 जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 713 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोमवारी 22 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आता पर्यंत 8 हजार 442 रुग्णांपैकी 7 हजार 849 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.97 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 316 बळी घेतले आहेत.