पाच टनाचा रिपोर्ट; दहा लाखांपेक्षा अधिक उलाढाल
रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी मिरकरवाडा येथील नौकेला घोळ मासा लागला होता. आता जयगड येथील दोन नौकांना सरंग्याची लॉटरीच लागली आहे. दोन नौकांना प्रत्येकी अडीच टन असा पाच टन सरंगा सापडला आहे. 400 रुपये किलोने हा सरंगा विकला गेला असून सरंगा विक्रीतून दहा लाखापेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे.
बुधवारी या नौका मासेमारीसाठी बाहेर पडल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी या नौकांनी जयगड बंदरानजिक डोल सोडली आणि बघता बघता जाळ्यात बंपर सरंगा सापडला. सापडलेल्या सरंग्याचा व्हिडीओ देखील मच्छीमारांनी केला आहे. गुरुवारी सायंकाळनंतर बंपर सरंग्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.