रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील चोवीस तासात केवळ 22 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 435 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 300 वर पोचली आहे.
मागील चोवीस तासात 435 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आता पर्यंत 44 हजार 528 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मागील 24 तासात 23 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 7 हजार 297 रुग्ण बरे झालेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.35 टक्के आहे. चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाल्याने मृत्यू संख्या 300 वर पोचली असून मृत्यू दर 3.67 टक्के आहे.