जिल्ह्यात 24 तासात 44 नवे पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 44 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 21 जण आरटीपीसीआर तर 23 जणांनी अंटीजेन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळले आहेत. नवे 44 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 973 वर पोचली आहे. 
 

मागील चोवीस तासात खेड मधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 292 वर पोचली आहे. शनिवारी 229 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत 42 हजार 242 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
 चोवीस तासात 33 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 7 हजार 071 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 88.68 टक्के आहे. तसेच जिल्ह्याचा मृत्युदर देखील 3.66 टक्क्यांवर पोचला आहे.

नव्याने सापडलेल्या 44 रुग्णांमध्ये सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यातील 20 तर खेड 8, गुहागर 4, चिपळूण 5, संगमेश्वर 1, लांजा 3, मंडणगड 2 आणि दापोली तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.