रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हळूहळू कमी होत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. मागील 24 तासात 38 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 669 वर पोचली आहे. मागील चोवीस तासात चिपळूण येथील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 273 वर पोचली आहे.
नव्याने सापडलेल्या 38 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 14 जण आरटीपीसीआर तर 24 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. सर्वाधिक 18 रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील तर चिपळूण तालुक्यात 11 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय खेड 4 आणि गुहागर तालुक्यात 5 रुग्ण सापडले आहेत.
चोवीस तासात जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 273 वर पोचली आहे. यामध्ये रत्नागिरीतील 57 वर्षीय, राजापूरातील 90 वर्षीय व दापोलीतील 55 वर्षीय रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आतपर्यंतचा मृत्युदर 3.5 टक्क्यांवर पोचला आहे.