रत्नागिरी: तालुक्यातील गाजलेल्या मैथिली गवाणकर खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल एक वर्षांनी या प्रकरणातील आरोपीला एलसीबी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निलेश ऊर्फ उक्कू प्रभाकर नागवेकर( वय -३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हा गुन्हा दाखल होवून १ वर्षाचा कालावधी झालेला असल्याने व अज्ञात आरोपीत याचा काहीही थांगपत्ता लागत नसल्याने पोलीस अधीक्षक तसेच मा.अपर पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याचे तपासाबाबत एलसीबी विभागाकडे तपासाची सूत्रे सोपवली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस पथकाने खेडशी गावातील स्थानिक लोकांशी संपर्क व जवळीक साधून गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेवुन खेडशी भंडारवाडी येथे रहाणारा निलेश ऊर्फ उक्कू प्रभाकर नागवेकर (वय -३५ वर्षे) यास सदर गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आलेले आहे. लवकरच मैथिलीच्या खुनाचे कारण समोर येण्याची शक्यता आहे.