खुशखबर; एसटीची शहर बससेवा आजपासून सुरू 

रत्नागिरी:-शुक्रवारपासून एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर रत्नागिरी शहर बस सेवा आजपासून सुरू झाली आहे. मागील अनेक दिवस शहर बस सेवा कधी पासून सुरू होणार याकडे प्रवाशांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र ही प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. शहर बससेवेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. दररोज शहर सेवेच्या 100 फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. लॉकडॉउन आधी शहर सेवेच्या 400 फेऱ्या रस्त्यावर धावत होत्या. 

सोमवारी शहर बससेवा सुरू करण्याला मुहूर्त मिळाला. सोमवारी काही ठराविक फेऱ्या सोडल्या गेल्या. प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिला.  या पूर्वी 400 गाड्या दररोज सोडल्या जात होत्या आता शाळा वगैरे बंद असल्याने आता सुरुवातीला 100 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बस मध्ये प्रवास करताना मास्क वापरणे सक्तीचे असून सॅनिटायजरचा वापर ही केला जात आहे.