नेवरे, जयगडला नव्याने रुग्ण; तालुक्यात 21 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार तालुक्यात 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

नव्याने सापडलेल्या 21 रुग्णांमध्ये रत्नागिरी शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. याशिवाय जयगड परिसरात नव्याने 3 रुग्ण सापडले आहेत. नेवरे येथेही 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच कसोप येथे 1, पावस येथे 1, बंदर रोड 2, शिरगाव 1, टिळक आळी 1, चिपळूण 1, सहकार नगर 1, कुवारबाव 1, साळवी स्टॉप 1, लांजा 1, दांडे आडोम 1, भांबेड 1, मुरुगवाडा 1, संगमेश्वर 1,  आणि खेड येथे  1 रुग्ण सापडला आहे.