पावस परिसरात कोरोनाचे तीन रुग्ण; तालुक्यात 26 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात 26 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 
 

नव्याने सापडलेल्या 26 नवीन रुग्णांमध्ये पावस परिसरात तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांत पावस मध्ये एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडून यायचे. मात्र सोमवारी तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. एकाच कुटुंबातील तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
 

याशिवाय चर्मालय 1, संगमेश्वर बोरसुद 1, शिवाजी नगर 1, कोर्ट कॅम्पस 3, कारवांची वाडी 2, मावळंगे 1, गणपतीपुळे 1, पोलीस लाईन 1, साळवी स्टॉप 1, तळेकांटे 1, मालगुंड 1, मारुती मंदिर 1, संगमेश्वर मुचरी 1, लांजा 1, शृंगारतळी 1 चिपळूण 1, कोळंबे 1, कळमबसते 1 आणि भाट्येत 2 रुग्ण सापडले आहेत.