जिल्ह्यात चोवीस तासात 179 पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात रोज कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मागील चोवीस तासात 179 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात आजपर्यंतची एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 588 वर पोचली आहे. तर चिपळूण तालुक्यातील 70 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 157 झाली आहे.
 

चोवीस तासात जिल्ह्यात 179 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये आरटीपिसीआर चाचणीत 85 जण तर अँटीजेन चाचणीत 94  कोरोना बाधित सापडले आहेत. जिल्ह्यात आज चिपळूण तालुक्यात सर्वाधिक 57 रुग्ण सापडले आहेत. आरटीपिसीआर चाचणीत मंडणगड 9, दापोली 1, खेड 18, गुहागर 8, चिपळूण 18, संगमेश्वर 10, रत्नागिरी 19 आणि लांजा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत दापोली 2, खेड 2, गुहागर 24, चिपळूण 39, रत्नागिरी 20 आणि लांजा तालुक्यातील 7 जणांचा समावेश आहे.