खेडशीत सहा तर तालुक्यात 29 नवे रुग्ण

रत्नागिरी:- शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालानुसार तालुक्यात 29 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात खेडशी येथे तब्बल 6 रुग्ण सापडले आहेत. तर एका डॉक्टरला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
 

तालुक्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी रात्री 29 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात खेडशीत एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जयगड येथे 7, पोलीस लाईन 4, लांजा 1, आठवडा बाजार 1, एक डॉक्टर, नाचणे 1, पोचरी 1, कारवांची वाडी 1, माखजन 1, जेलरोड 1, देवरुख 2 आणि मारुती मंदिर येथे 1 रुग्ण सापडला आहे.