गुहागर:- -कोकणात आज पाच दिवसाच्या गणपती सोबत गौरी विसर्जनही आज सुरू आहे. गणपती विसर्जन करते वेळी आज संध्याकाळी गुहागर तालुक्यात दोन जण बुडाल्याने या विसर्जनाला गालबोट लागले आहे.
गुहागर तालुक्यातील बोऱ्या जेटीवर आज सायंकाळी चारच्या दरम्यान गणपती विसर्जनासाठी गर्दी जमली होती. यावेळी या जेटीवर गणपती विसर्जन करताना वैभव देवळे (वय 30) व अनिकेत हळये (वय 20) असे दोघेजण दुर्दैवी रित्या बुडाले. स्थानिकांच्या मदतीने यांचा शोध सुरु आहे. मात्र गणपती विसर्जन करताना हे दोघं बुडाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.