जिल्ह्यात कोरोनाचे 60 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 3405

रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचे 60 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 3 हजार 405 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत तब्बल 21 हजार 706 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

नव्याने आलेल्या अहवालांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे अहवाल रत्नागिरीतील आहेत. तर ॲन्टीजेन  टेस्ट मधील रत्नागिरीतील 11, कळंबणी 14, चिपळूण 7, दापोली 18 अशी एकूण 11 अधिक 50 अशा 61 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.(01 रुग्णांचा अहवाल दोन्ही तपासणी मध्ये पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60 आहे.)  

जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  3405 असून बरे झालेले  रुग्ण 2118 आहेत तर उपचारात असणारे ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 1287 आहेत.