रत्नागिरी:- कातळवाडी-कुवारबाव येथील वृद्धाने मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून संशयिताने लोखंडी सळी डोक्यात घालून जखमी केले. जखमी वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रींकात सावंत असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) दुपारी एकच्या सुमारास कातळवाडी-कुवारबाव येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी फिर्यादी पुंडलिक ज्ञानदेव पाटील (वय ६०, रा. कातळवाडी-कुवारबाव) यांनी संशयित श्रीकांत सावंत यांच्याकडे मजुरीचे पैसे मागितले. त्याचा राग मनात धरुन संशयिताने त्यांच्या डोक्यात लोखंडी सळी घालून जखमी केले. जखमी पाटील यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार संतोष गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.