अंगणवाडीच्या पोषण आहारात उंदीर सापडल्याने खळबळ

साखरपा:-  महाराष्ट्र शासनातर्फे स्तनदा व गरोदर माता यांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्याच्या पॅकिंग मध्ये चक्क मेलेला उंदीर सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

पोषक आहाराच्या पाकिटामध्ये उंदीर सापडल्याची माहिती मिळताच कोंडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका जोयशी यांनी कोंडगाव मुरलीधरआळी येथील अंगणवाडीमध्ये संबंधित प्रकाराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर तालुका गटविकास अधिकारी यांना फोनवरून संपर्क करीत संबंधित घटनेची चौकशी करावी व जबाबदार एजन्सीवर कार्यवाही करावी असे सांगितले. तसेच याविषयीं माहिती देताना सांगितले कि, हा आमच्या गावातील नागरिकांच्या जीवाशी सुरु असलेला प्रकार अतिशय गंभीर असून यापढे हे खपवून घेतलं जाणार नाही. दर महिन्याला हे पोषक खाद्य एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्यामाध्यमातून या धान्याचे वितरण अंगणवाडी मधून केले जाते.साधारण सरासरी महिन्याला 20-25 महिलांना हे खाद्य दिले जाते. हे निकृष्ट खाद्य खाल्ले तर याची लागण लहान बालकांना होऊन दुर्दैवी घटना घडू शकते, याला कोण जबादार असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.त्यामुळे जबाबदार व्यक्तीवर अथवा एजन्सीवर शासन स्थरावरून कोणती कार्यवाही होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.