चिपळूण:- दिवा पॅसेंजर रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाची ६६ हजार रुपये किंमतीचे दागिने असलेली पर्स चोरट्याने लांबवल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची फिर्याद महादेव भिकाजी गुरव (५९, राजापूर) यांनी दिली. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.५० च्या सुमारास महादेव गुरव हे त्याच्या पत्नीसह दिवा ते रत्नागिरी असा दिवा पॅसेंजर या रेल्वेगाडीतून प्रवास करत होते. यावेळी खिडकीच्या वरील बाजूस महादेव गुरव यांनी त्यांच्या पत्नीची पर्स हुकला अडकवून ठेवली होती. मात्र प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने ही पर्स चोरुन नेली. त्यामध्ये ६६ हजार रुपये किंमतीचे दागिने होते. हा प्रकार सावर्डे रेल्वेस्थानकावर उघडकीस आला.