प्रधानमंत्री आवास शहरी 2.0 योजना सुरू

रत्नागिरी:- केंद्र सरकारने शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गीयांसाठी प्रधानमंत्री आवास शहरी 2.0 योजना सुरू केली आहे. किफायतशीर दरात घर तयार करणे, खरेदी करणे यासाठी या योजनेची मदत होणार आहे. यासाठी अटीशर्ती लागू असून, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभा घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी पालिकेने केले आहे.

यासाठी अर्जदाराने आधारकार्ड (मोबाईल क्रमांक संलग्न असणे आवश्यक), कुटूंबातील इतर सदस्यांचे आधारकार्ड (पती-पत्नी, अविवाहित मुले/मुली), बॅंकखाते (आधारकार्डचे संलग्न असणे आवश्यक), चालू वार्षिक उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, जागेचे कागदपत्र, शिधापत्रिका, मतदान कार्ड, कर सर्वेक्षण उतारा, चालू वर्षांची कर भरणा केलेली पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी भारतामध्ये लाभार्थी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचे नावे पक्के घर नसावे, लाभार्थ्याने गेल्या २० वर्षात कोणत्याही घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा व वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ३ लाख कमाल राहील.

या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी www.https://pmav-urban.gov.in या संकेतस्थळावर जाऊन PMAY-U-2.0 साठी निवेदन करण्यासाठी वे. बीएलसी या अंतर्गत सरकार ४५ चौरस मीटरपर्यंत स्वमालकीच्या जागेमध्ये घर तयार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार २.५ लाखांची आर्थिक मदत देईल. यासाठी पात्र व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न कमाल ३.०० लाख असणे आवश्यक आहे. आयएसएस (ISS) यामध्ये घराची किंमत ३५ लाख रुपयापर्यंत असेल तर २५ लाख रुपयांपर्यंत गृहकर्जाची विशेष सुविधा देण्यात येईल. १२० चौ. मी. वा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचे घर खरेदी करणाऱ्यांना १.८० लक्ष रुपयांपर्यंत बँकेमार्फत अनुदान देण्यात येईल.