दिलासा; 24 तासात अवघे चार रुग्ण; दोन रुग्णांचा मृत्यू 

रत्नागिरी:- गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 4  नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2016  झाली आहे. नव्याने सापडलेल्या चार रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 1 तर राजापूर मधील 3 रुग्ण आहेत. 

दरम्यान 14 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1371 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये  माटे हॉल, चिपळूण  9, समाजकल्याण मधील 3 आणि देवधे, लांजा येथील 2 रुग्ण आहे.      

तारा आर्केड, रत्नागिरी येथील 66 वर्षीय आणि गोळप, रत्नागिरी येथील 68 वर्षीय कोरोना रुग्णांचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 68 झाली आहे.