रत्नागिरी:- खाते वाटप झाल्यावर महिनाभर पालकमंत्रीपदाची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकमंत्री पदाची निवड कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील पालकमंत्र्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची निवड करण्यात आली आहे
पालकमंत्री निवडीची यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. रत्नागिरीच्या पालकमंत्री निवडीची घोषणा करण्यात आली असून अन्य जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नावाचा देखील यात समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उद्योग व मराठी भाषा या दोन खात्यांच्या कार्यभार सांभाळणारे मंत्री उदय सामंत यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.