लांजाः– तालुक्यातील खेरवसे गावामध्ये गेले आठ दिवस बिबट्याची दहशत सुरू असून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक बैल व एक गाय ठार झाली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
खेरवसे शेजारील आसगे गावामध्ये महिनाभरापूर्वी बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. पाळीव प्राणी फस्त केल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर बिबट्याने खेरवसे गावाकडे आपला मोर्चा वळवला असून रात्री-अपरात्री बिबट्या लोकवस्तीत नागरिकांच्या नजरेस पडत आहे. गेले आठ दिवस बिबट्याने दहशत निर्माण केली असून चार दिवसात बिबट्याने एक बैल व एक गाय ठार केली. मोकाट जनावरांवर बिबट्या हल्ला करत आहे.