संगमेश्वर:- संगमेश्वर बाजारपेठेतील घरात प्रवेश करीत बिबट्याने कुत्र्याची तीन पिल्ले पळविली आहेत. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी बिबट्या कॅमेरात कैद झाला होता. दोन दिवसांपूर्वी संगमेश्वर बाजारापेठेत भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या कॅमेरात कैद झाला होता. येथील सौरभ रसाळ यांच्या चारचाकीला असलेल्या कॅमेऱ्यात सदरचा बिबट्या कैद झाला आहे.
काही दिवस संगमेश्वर शहर तसेच संभाजी नगर भागात बिबट्याचा वावर सुरु असून पोटाची भूक भागवण्यासाठी मुक्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी भटकंती करताना काहींना त्याचे दर्शन सुद्धा झाले असल्याचे बोलले जात होते. एवढेच नव्हे तर शहरात वावरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येत ही घट झाली आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच काही वाहन चालकांना सुद्धा बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा होती त्यामुळे शहर अंतर्गत रस्त्यांवरील रात्रीची वाहन वर्दळ सुद्धा रोडवली होती.
आता तर चक्क मानवी वस्ततीत वावरताना बिबट्या कॅमेऱ्यातच कैद झाला आहे. त्यामुळे बिबट्याचे वावरणे सुरु असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. संगमेश्वर येथील सौरभ रसाळ हे त्यांच्या चारचाकी गाडीने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गांवररून पोस्ट कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याने शुक्रवारी रात्री जात असताना. रस्त्याच्या एका बाजूने दुनया बाजूला जात असतानाचे दृश्य गाडीच्या कॅमेऱ्यात कैद झाले. दोन दिवसांनंतर वाघाने याच ठिकाणची तीन कुत्र्यांची पिल्ली पळविली आहेत.