रत्नागिरी:– शनिवारी रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 55 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 20 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात असणाऱ्या एकूण पॉझिटीव्ह रुग्नांची संख्या आता 1 हजार 881 झाली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 20, कळंबणी 17, कामथे 10, देवरुख 4, दापोली 3 आणि रायपाटण मध्ये 1 रुग्ण सापडला आहे.