लांजा:- पडलेल्या वादळी पावसामुळे लांजा तालुक्यातील निवसर आग्रेवाडी येथे एका घरावर आंब्याचे मोठे झाड कोसळून वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
रवींद्र यशवंत मेस्त्री 65. रा. निवसर आग्रेवाडी, ता. लांजा) असे उपचार सुरू असताना निधन झालेल्या या घटनेतील पित्याचे नाव आहे तर त्यांचा मुलगा राजेश रवींद्र मेस्त्री (30) हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या परतीचा पाऊस सुरू झाला असून रविवारी पडलेल्या परतीच्या पावसामुळे तालुक्यातील निवसर येथील मेस्त्री कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागील पाच दिवसापासून सायंकाळच्या वेळी परतीचा पाऊस पडतो आहे.
निवसर मेस्त्रीवाडी येथे घडलेल्या घटनेबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या दरम्यान वादळी पाऊस पडला. निवसर आग्रेवाडी येथील रवींद्र यशवंत मेस्त्री यांच्या घरासमोर असणारे आंब्याचे मोठे झाड वादळाने उन्मळून घरावर पडले. त्यामुळे घराचे पत्रे व छत कुटुंबप्रमुख रवींद्र मेस्त्री तसेच त्यांचा मुलगा राजेश मेस्त्री यांच्या अंगावर झाड कोसळल्याने हे दोघेही घरात जखमी अवस्थेत अडकून पडले होते. या घटनेत रवींद्र यांची सून आणि तिचे लहान बाळ यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. घरावर झाड घरावर पडल्याचा मोठा आवाज झाल्याने घरातील इतर माणसांचा ओरडल्याचा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी मेस्त्री यांच्या घराकडे धाव घेतली. मदतनीसाठी धावून आलेल्यांनी घरामध्ये अडकलेल्या रवींद्र आणि त्यांचा मुलगा राजेश याना बाहेर काढण्यात आले.
गंभीर दुखाापत झाल्याने दोघांनाही पाली येथे प्राथमिक उपचार करून अधिम उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. या घटनेतील जखमी वडील आणि मुलावर रत्नागिरी येथे उपचार सुरू असताना यातील रवींद्र मेस्त्री यांचे सोमवारी निधन झाल्यने मेस्त्री कुटुंबावर दुःख ओढवले आहे. जखमी झालेल्या राजेश याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची लांजा पोलिसांना माहिती मिळताच लांजा पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली.