समृद्ध कोकण संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु

रत्नागिरी:- कोकणातील पर्यटन, मच्छीमार, कृषी क्षेत्रावर झालेल्या अन्यायासाठी विरोधात समृद्ध कोकण संघटनेतर्फे स्वराज्यभूमी कोकण आंदोलन यांच्यावतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले आहे.

गुरुवारी मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण कोकणात हे आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनामध्ये आंबा बागायदारांना कर्ज माफी मिळावी या मुख्य मागणीसह पर्यटन वाढण्यासाठी पायाभुत सुविधांचे मजबुतीकरण करावे, कृषी क्षेत्रालाही चांगले दिवस यावे यासाठी आंदोलन होणार आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.७५ वर्षे कोकण दुर्लक्षित आहे. ३८ टक्के उद्योग, प्रमुख बंदरे कोकणात आहेत. कोकण आर्थिक विकासाचा कणा आहे, तरी पायभुत सुविधांची वानवा आहे. समृद्ध कोकण संघटनेने स्वायत्त कोकण हवे. शासनाकडुन येणार्या निधीचा योग्य विनियोग होत नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्टर बाजूला करून तज्ज्ञांचा यामध्ये समावेश करून निधीचा योग्य वापर करावा, अशी मागणी असल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले.

कोकण विकास प्राधिकरण मंजूर आहे. परंतु त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद नाही. ही अनास्था संपावी यासाठी आम्ही हे आंदोलन आहे. यावेळी बाबा साळवी, दिपक उपळेकर, संदीप शिरधनकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.