रत्नागिरी:- जुनी पेन्शन योजना लागू करण्याची अधिसूचना, शासन निर्णय जारी करणे तसेच 2 फेब्रुवारी 2024 चा वित्त विभागाचा शासन निर्णय जिल्हा परिषद कर्मचाऱयांना लागू करणे व इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचारी 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री यांच्याशी प्रलंबित मागण्यांबाबत झालेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पटलावर ठेवल्यानुसारच सुधारित निवृतीवेतन योजना राबवली जाईल, असे अभिवचन दिले. या आश्वासनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले कामबंद आंदोलन पुढे ढकलले आहे.
कर्माऱ्याना इतर विषयांबाबत निर्णायक चर्चा दोन ते तीन दिवसात होईल असे आश्वासन मुख्यमत्र्यांनी दिले. समन्वय समितीच्या विस्तारित सभेत मुख्यमंत्री यांनी विनंती केल्यानुसार अपेक्षित निर्णय घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देणे योग्य होईल, असा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे 29 ऑगस्टच्या नियोजित संपाची बदललेली पुढील तारीख 4 सप्टेंबर 2024 रोजी समन्वय समितीची पुन्हा विस्तारित सभा घेऊन ठरवण्यात येणार आहे.