रत्नागिरी राजनगर येथे महिलेला मारहाण, एकावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील राजनगर येथे एकाने गॅस शेगडीवरील गरम तवा महिलेच्या खांदयावर मारून दुखापत केली व शिवीगाळ करत ठार मारण्यांची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलिसांकडे एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

२२ ऑगस्ट रोजी राजनगर येथे ही घटना घडली. या गुन्ह्याचा आरोप निलेश कृष्णा कोंडविलकर, (रा. मातेश्री बंगला, कोकणनगर रत्नागिरी) याच्यावर पोलिसांनी ठेवला आहे. निलेश याने फिर्यादी यांचेशी भांडण करून गॅस शेगडीवरील गरम तवा त्यांच्या डाव्या खांद्यावर मारून दुखापत केली. मारहाण करून शिवीगाळही केली व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत.