रत्नागिरी:- तालुक्यातील कळझोंडी धरणाच्या भिंतीजवळ एका २८ वर्षीय तरुणीचा बुडालेल्या स्थितीत मृतदेह मिळून आला आहे. याप्रकरणी जयगड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋणाली रविंद्र जोगळे असे त्या तरुणीचे नाव आहे. २१ ऑगस्ट रोजी ती दुपारी १२.३० वा. घरातून कोणालाही न सांगता निघून गेलेली होती. तिचा सर्वत्र शोध सुरू होता. अखेर तिचा मृतदेह कळझोंडी धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात बुडालेल्या स्थितीत मिळून आला.