कारवांचीवाडी येथून दुचाकीची चोरी

रत्नागिरी:- कारवांचीवाडी येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ ते २५ जुलै सकाळी नऊच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विरेंद्र गोविंद गोताड (वय ३५, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी ५५ हजाराची राखाडी रंगाची दुचाकी (क्र. एमएच-०८ एएन ७७८७) घराच्या शेडमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.