रत्नागिरी:- कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या राज्यस्थान येथील प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. राजवीर सिंह (वय ३९, रा. दुलाराम, किशनपुरा, चुरु, राजस्थान) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २८) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ११२ क्रमांकावरील फोन घेणारे अशोक यमगर यांनी पोलिसांनी कुवारबाव येथे अज्ञात प्रौढ बेशुद्ध अवस्थे असल्याची खबर दिली. पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांन त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.