रत्नागिरीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा पुतळा शिवसैनिकांनी जाळला

रत्नागिरी:- राज्यसभेत खासदारकीची शपथ घेताना भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शेवटी जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली होती. हा शिवरायांचा अवमान आहे. असा आक्षेप घेत रत्नागिरी जिल्हा शिवसेनेच्या वतीने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे शिवसैनिकांनी दहन केले. खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयासमोर पुतळयाचे दहन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकार्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त  केल्या.

सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या वतीने राज्यसभेवर खासदारकिची शपथ घेतली.शपथ पुर्ण झाल्यानंतर त्यांनी शेवटी जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. त्यानंतर  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  यांनी अशा घोषणा देऊ नयेत माझ्या कार्यालयात चालणार नाही , असे  खा. उदयनराजे भोसले यांना  सुनावले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या कृतीचा निषेध व्यक्त केला जात आहे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा रत्नागिरीची शिवसेनेच्यावतीने प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजी या गजर करत शिवसैनिकांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या भूमिकेचा निषेध केला. शिवाजी  महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिली आहे. 

खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना पदाधिकारी एकत्र आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके नगराध्यक्ष प्रदिप ऊर्फ बंड्या साळवी, शहर प्रमुख बिपीन बंदरकर विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, विभाग प्रमुख विजय खेडेकर उपजिल्हा प्रमुख संजय  साळवी, नगरसेवक निमेश नायर, प्रशांत सुर्वे यांच्यासह सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.