चांदेराई नजीक दारु विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे जाणाऱ्या रस्त्यालगत विनापरवाना गावठी दारुची विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता.२२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुरतडे जाणाऱ्या रस्त्यालगत पडक्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयित महिलेकडे विनापरवाना साहित्यास २७० रुपयांची पाच लिटर गावठी दारु सापडली. या प्रकऱणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजावली आहे.