देवरुख:- देवरूख-साखरपा मार्गावरील पर्शरामवाडी फाटानजीक इको व हुंडई ऑरा यांच्यात धडक होवून मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. इको गाडीची चाके वरती झाली होती. प्रवासी आतमध्ये अडकले होते. स्थानिक तरूण, वाहनचालकांनी काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात 11 जण जखमी झाले.
देवरूख-साखरपा मार्गावर मंगळवारी दुपारी 12 च्या दरम्यान इको (गाडी एमएच-43, बीयु-8439) व हुंदाई ऑरा (गाडी क. एमएच- 03, डीयु-1094) यांच्यात धडक होवून अपघात घडला. इकोमधील प्रवासी हे चिपळूण येथील आहेत. तर ऑरा गाडीतील प्रवासी मालवण येथील असून ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. अपघातातील इको गाडी उलटून चाके वरती झाली होती. प्रवासी मदतीसाठी आकांत करत होते. स्थानिक तरूण व वाहनालकांनी समयसुचाकता दाखवत गाडीच्या काचा फोडून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. इको व ऑरा वाहनातील जखमींना तत्काळ देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये पर्वणी आनंद दळवी (18), मेधा अनिल दळवी (17), पूर्वा अनिल दळवी (42), रिषी अनंत दळवी (21), अनिल विष्णू दळवी (48), साक्षी रूपम पाटणे (35), अरूण अरविंद रेडीज (75), सोनल अतुल लाड (49), पार्थ अतुल लाड (25), भास्कर अरविंद रेडीज (45) व अरविंद लक्ष्मण रेडीज (80) यां समावेश असल्याची माहिती देवरूख ग्रामीण रूग्णालयातून प्राप्त झाली आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देवरूख पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.