रत्नागिरी:- दत्तक घेण्याच्या बाळाला प्रकरणामध्ये रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने पाचजणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांच्या समोर वेगवेगळ्या तीन जामीन अर्जाची सुनावणी झाली. ॲड. महेंद्र मांडवकर यांनी अर्जदारांची बाजू मांडली. नितीन शांताराम मोहिते (रा. पाली, तालुका रत्नागिरी) हे दत्तक अर्भक मातेचे बंधू होत. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठीच्या अर्जात म्हटले की न्यायालयीन प्रकरणात रक्कम स्वीकारण्याविषयी कोणताही आरोप नाही. याशिवाय संतोष विजय माने आणि आज्ञा संतोष माने (रा. शिरगाव – रत्नागिरी) हे दत्तक पाल्याचे पालक होत. याशिवाय अजय महेंद्र जाधव आणि शनया निलेश जाधव उर्फ मायरी महेंद्र जाधव (कोळीसरे) हे दत्तक अर्भकाचे पालक यांचे मित्र आहेत. या सर्वांना न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. अपत्याला दत्तक देताना ६० हजार रुपये घेतले असा आरोप करण्यात आला होता. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.