सोमवारपासून बाजारपेठ बंद होणार असल्याची अफवा

अफवा पसरवणार्‍यावर कारवाई होणार

रत्नागिरी:- रत्नागिरीत सोमवारपासून लॉकडाऊन होणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत असून त्याची जोरदार चर्चा बाजारपेठ, दुकानदार आणि ग्राहकांमध्ये आहे. त्यात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी यांनी केला आहे.

यामुळे लॉकडाऊन होणार या भीतीने होणारी बाजारातील गर्दी ग्राहकांनी टाळावी. आजवर घेतलेल्या निर्णयानुसार लॉकडाऊन होण्याआधी पुरेसा वेळ ग्राहकांना खरेदीसाठी व दुकानदारांना आपला नाशिवंत माल संपवण्यासाठी दिला जातो त्यामुळे अचानक लॉक डाऊन होणार नाही, अशी माहिती जाणकारांकडून मिळत आहे. यापुढे प्रशासनाने लॉकडाऊन केला तर तो कडक असावा, या काळात फक्त औषधांची घरपोच सेवा व फक्त दूध विक्री चालू ठेवावी तरच त्या लॉकडाऊनचा उद्देश सफल होईल, असे नागरिकांचे मत आहे.