शिरगाव-बाणेवाडी येथे नेपाळ्याचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहराजवळी शिरगाव-बाणेवाडी येथे एक नेपाळी त्यांच्या सहकाऱ्याकडे गेला होता. रात्री जेवण करुन झोपल्यानंतर सकाळी त्याची हालचाल दिसली नाही. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

नवराज बळीराम पुरी (वय ५०, रा. शिरगाव-आडी कलमाच्या बागेत, रत्नागिरी) असे मृत नेपाळ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) सकाळी सहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवराज पुरी हे रविवारी (ता. १९) सहकारी शेरबहाद्दुर हरी थापा हे रहात असलेल्या शिरगाव बाणेवाडी येथे भेटायला गेले होते. तेथे रात्री ते राहिले. सोमवारी त्यांना थापा हे उठवायला गेले असता त्यांची हालचाल दिसून आली नाही. म्हणून थापा यांनी पोलिस पाटील व पोलिस स्टेशन येथे खबर दिली. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.