रत्नागिरी:- कुवारबाव येथील आरटीओ ऑफिस रस्त्यावर दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने अपघात झाला. या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. जयवंत सखाराम पवार (वय ३६, रा. पोमेंडी बुद्रुक रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना २५ एप्रिलला सकाळी सव्वा आठच्या सुमारास आरटीओ ऑफिस समोरील रस्त्यावर रेल्वे ब्रिज पुढील बाजूस घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुदीप प्रकाश पवार (वय ३५, रा. शांतिनगर, नाचणे, रत्नागिरी) यांचा चुलत भाऊ जयंवत हा दुचाकी (क्र. एमएच-०८ एक्स ९७८४) ही घेऊन आदनाथ नगर येथे जात असताना आरटीओ ऑफिस समोरील रेल्वे ब्रिज जवळ आले असता अचानक त्यांच्या दुचाकी समोर कुत्रा आडवा आला त्यामुळे दुचाकीवरील जयवंत यांचा ताबा सुटला व अपघात झाला. या अपघातात त्यांच्या गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.